SHARE

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार किंवा नाही, या कालपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री रावते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोर्चात उपस्थित राहत नसल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्हाधिकारी जयराम यांनी प्रवेश बंदी जारी करून व्हाट्स अँपला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी विविध कारण पुढे करून प्रवेश देता येत नसल्याचे म्हटले आहे. मी एक मंत्री आहे. कायद्याचे मला पालन करणे जरुरी आहे. त्यासाठी एका सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी त्याचे पालन करून प्रवेश आदेशाचे उल्लंघन करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या सदर्भात पुढील भिमिकेबद्दल पक्ष प्रमुखाशी चर्चा केली जाईल,असे रावते म्हणाले.