SHARE

बेळगाव: केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी आंतरराष्ट्रीय टेंडर शनीवारी ओपन करण्यात आले. 76 कोटी रुपयांचा समावेश या निविदात असून शहरातील अनेक विकास योजनासाठी निविदा काढली आहे. निविदाची मुदत दोन महिने आहे. राज्यातील सहा शहरांची निवड केली असून त्यापैकी एक बेळगाव आहे. बेळगाव येथील कामाला निविदा काढून चालना देण्यात येत आहे.

स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र सरकारने इंटिग्रेटेड कमांडंट कंट्रोल रूम स्थापनेला सूचना दिल्या आहेत. महापालिका आणि हा विभाग मिळून योजना तयार करते. देशातील स्मार्टसिटी योजनेसाठी निवड झालेल्या शहरात कक्ष सुरू केला आहे. कचऱ्याची विल्हेवाट, त्याची काळजी घेणं आणि योजना आखणे हा यामागील उद्धेश आहे. -वीज खांबावर सीसीटीव्ही बसविण्याचे कामही या कक्षाचे असेल. विविध संदर्भात व्हाट्स अँप आणि मेसेज करण्याचे काम असेल. अपराध आणि गुन्हे रोखण्याचा उद्देश यामागील असेल.