SHARE

बेळगाव: डॉक्टरासह दुचाकीस्वार बेनकनहळी येथील अपघातात ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. चंद्कांत बीदगे (वय 60, रा. बेलगुंदी) आणि विनायक पाटील (वय 24, रा मच्छ) अशी मृतांची नावे आहेत. घरकुल वृद्धाश्रम येथे बेळगावकडून बेनकनहळी आणि बेनकनहळीयेथून बेळगावकडे येणाऱ्या दुचाकी अमोरासमोर आल्या आणि अपघात झाला. त्यात दोघे जखमी झाले आणि उपचार सुरू असताना मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याची नोंद आहे.