SHARE

बेळगाव: बिम्समधील नर्सने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता 12) सकाळी उघडकीस आली आहे. राजश्री केसरकोप्प (वय 36) असे त्यांचे नाव आहे. राजश्री यांचे श्रीनगर येथे घर आहे. राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन जीवन संपविले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मृत्युपत्र लिहिले आहे.

आत्महत्येला कोणी जबाबदार नाही, मी स्वतः आत्महत्या करत आहे, असा उल्लेख पत्रात आहे. राजश्री विवाहित असून त्यांना 7 वर्षाची मुलगी आहे. घटनेची कल्पना मिळाल्यानंतर माळमारुती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.