SHARE

बेळगाव: राज्यातील काँग्रेस सरकारची वाटचाल हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधातील आहे, असा आरोप भाजप करत शरत यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास दल (NIA) यांच्याकडे वर्ग करण्याची मागणी जिल्हाधिकारी जयराम यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते शरत मडीवाळ यांची हत्या झाली आहे. पण,त्याची चौकशी अजून गती घेतली नाही. त्यावरून सरकारचे धोरण हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी याची चौकशी एनआयएकडे देण्यात यावी, अशी मागणी भाजपनी केली आहे. राजेंद्र हरकुनी, किरण जाधव, अनिल बेनके, रवी पाटील, लीना टोपपन्नावर, राजू टोपपन्नावर आदी उपस्थित होते.