SHARE

बेळगाव: शिवाजीनगर येथील अपघातात दुचाकीवरून पडून महिला ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. विद्या भोवी असे त्यांचे नाव असून कुमारस्वामी लेआऊट येथे त्या राहतात. विद्या या मुलगा अजित यांच्यासोबत दुचाकीवरून जात होत्या. शिवाजीनगर येथे अजित याचे नियंत्रण सुटले आणि तो आणि विद्या गाडीवरून खाली पडल्या. यावेळी पाठीमागून बस आली आणि त्याखाली सापडून विद्या यांचा जागीच मृत्यू झाला आहे.