SHARE

बेळगाव: गेल्या सुमारे साडे चार वर्षांपासून बेळगावला जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या एन. जयराम यांची अखेर बदली झाली आहे. जयराम यांची बेंगलोरला वाणिज्य आणि औद्योगिक विकास मंडळाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी कोण रुजू होणार आहेत, हे अजून स्पष्ट नाही. जयराम यांच्या बदली संदर्भात खुपदा चर्चा झाल्या. पण, प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही. गेल्या महिन्यात चार आठवड्याचे मसुरीला प्रशिक्षण होते. पण, प्रशिक्षण ऐनवेळी रद्द झाले. आता त्यांच्या बदलीचा आदेश जारी झाला असून त्यांच्यासोबत सुमारे 12 आययएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.