SHARE

बेळगाव: इनक्रेडीबल बेळ गाव आणि शातात समिती शहापूरतर्फे पोलीस निरीक्षक डी.सी.लक्कन्नवर यांच्या निवृत्तीबद्दक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शहापूर पोलीस स्थानकांमार्फत लककन्नवर यांनी जनतेच सौहार्द पूर्ण वातावरण तयार केले. पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्त टीम ला लाभले याचा अभिमान आहे असे उदगार पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी काढले. शहापूर पोलीस निरीक्षक लककन्नवर यांचा निवृत्ती निमित्य शांतता समिती च्या वतीने जिव्हेश्वर भवन वडगाव येथे सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

एका पोलीस निरीक्षकासाठी जनतेने इतका चांगला कार्यक्रम राबवणं कवचित असत, असे वक्तव्य पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी व्यक्त केल. एसीपी शंकर मारिहाळ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.