SHARE

बेळगाव: माजी खासदार अमरसिह पाटील बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवरीवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बंगलोर येथे या विषयावर बैठक आहे. या बैठकीत त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अमरसिह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बेंगलोर येथे उद्या (ता 12) चर्चा करतील आणि यानंतर भाजपच्या उमेदवारीवर उत्तर मतदार संघातुन निवडणूज लढवतील, अशी खात्रीलायक माहिती आहे. अमरसिह भाजप पक्षाच्या संपर्कात आहेत, याचा दुजोरा काँग्रेस पक्षाकडून मिळाला आहे. तसेच त्यांना भाजप उमेदवारी देईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आमदार फिरोज सेठ यांना तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिळणार आहे. लढत चुरशीची ठरेल, असे मानले जात आहे. अमरसिह स्पर्धेत उतरत असल्यामुळे भाजपमधील अन्य इच्छुकांची कोंडी झाली आहे.

Now get Belagavi/Belgaum news in marathi only on marathi.thebelgaumnews.com