SHARE

बेळगाव: बेळगाव मराठा मंडळतर्फे आज शहरात पाणी वाचवा, झाडे लावा या विषयावर जनजागृती रॅली काढण्यात आली. 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते. आमदार फिरोज सेठ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरदार मैदान येथून रॅली सुरू झाली. पाण्याचा व्यवस्थित वापर करावा, जल संवर्धन करावे आणि झाडे लावून पर्यावरण वाढीसाठी प्रयत्न केले जावे, असा संदेश या रॅलीतून दिले आहे. या रॅलीत वैधकीय आणि तांत्रिक विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सरदार्स मैदान येथून रॅली सुरू होऊन बोगरवेस, चनमा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीची सांगता झाली. मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर आणि संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.