SHARE

बेळगाव: येत्या गणपती उत्सवला सार्वजनिक गणपती मंडळाच्या मूर्तीची उंची दहापेक्षा कमी असावी, असा आदेश जिहाधिकारी झियाउल्ला यांनी दिले आहेत. येत्या 25 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आहे. याची पूर्वतयारी बैठक झाली. या बैठकीत आदेश दिले गेले आहेत. जिल्हात 350 सार्वजनिक गणपती मंडळ आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियमाचे पालन करावे. नियमबाह्य, अनधिकृत पद्धतीने वीज जोडणी करू घेतली किंवा वाहतुकीचे नियम मोडले, डॉल्बी लावणे अशा प्रकारला थारा देण्यात येऊ नये. या उत्सव दरम्यान वीज सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

आमदार संभाजी पाटील, निवासी जिल्हाधिकारी सुरेश, पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर उपस्थित होते.