SHARE

बेळगाव: चलो मंगळूर आवाहनाला प्रतिसाद देत बेळगाव शहरात आयोजित दुचाकी रॅली चनमा चौकात अडवून आमदार संजय पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्याना आज ताब्यात घेतले आणि थोड्या वेळाने सोडून दिले.

आमदार संजय पाटील यांनी या करवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील काँग्रेस सरकार न्याय आणि हक्कसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा हक्क हिरावून घेत आहे. राज्यातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला अवघड जाणार आहे, असा इशारा दिला आहे. एसीपी सी. टी. जयकुमार यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.