SHARE

बेळगाव: अडीच वर्षाच्या बलिकेवर बलात्कार करून तिला जिवे मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला फाशी द्या, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीतर्फे आज कऱण्यात आली आहे. बैलहोंगल तालुक्यातील वणूरला एका अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर गावात तणाव आहे. बेळगावात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे. त्यात आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे.

बैलहोंगल तालुक्यात वन्नुरला अडीच वर्षाच्या बालिकेला फूस लावून बलात्कार करण्यात आल्याबद्दल सुभाष महादेव नायकर (24, वन्नूर, ता. बैलहोंगल) याला अटक केली आहे. सुभाषने सदर बालिकेवर अत्याचार करून तिला जिवंत पुरण्याची योजना आखली होती. या कृत्यबद्दल संतप्त महिलांनी सहाययक एसपी उमेश गडादी यांना दिले आहे. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले.