SHARE

बेळगाव: येत्या 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे काळादिन पाळला जाणार आहे. या रॅलीत आणि सभेला महाराष्ट्र येथील दिगग्ज नेत्यांना निमंत्रण दिले आहे. सीमाप्रश्न लढ्यातील जेष्ठ नेते एन. डी. पाटील, नितेश राणे यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे सभेला गर्दी वाढणार असून युवकांची मोठी फळी कार्यक्रमनिमित्त उपस्थित राहणार आहे, असा दावा महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र येथील नेत्यांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. लवकरच एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न लढ्याला 6 दशक झाले असून दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन म्हणून पाळला जातो आणि यादिवशी शहरामध्ये भव्य रॅली आयोजित केली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आयोजित रॅलीला विशेष महत्व असते. त्यासाठी या रॅलीची आतापासून तयारी सुरू केली असून गावोगावी जागृती सभा आणि बैठका दिवाळीनंतर घेतल्या जाणार आहेत. यानंतर महामेळाव्याची तयारी केली जाणार आहे. 13 नोव्हेंबर ला बेळगावला अधिवेशन होणार असून यादिवशी महामेळावा होणार आहे. याची तयारी 1 नोव्हेंबर नंतर केली जाणार आहे.