SHARE

बेळगाव: पुढील महिन्यात 10 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान जयंती साजरी केली जाणार असून, येथील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जयंती साजरी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यक्रम येथील कुमार गंधर्व आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी वक्ते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिली आहे. यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर., महापालिका आयुक्त शशीधर कुरेर, निवासी जिल्हाधिकारी सुरेश इटनाल उपस्थित होते.