SHARE

बेळगाव: खानापूर येथील रहिवाशी आणि बनावट मुद्रांक घोटाळ्याबद्दल जन्मठेप शिक्षा झालेल्या अब्दुल करीम तेलगीचे निधन झाल्यानंतर त्याचा मृतदेह आज त्याच्या मूळगावी आणण्यात आले. येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

बनावट मुद्रांकची छपाई करून त्याची विक्री करणाऱ्या मोठया टोळीचा पर्दाफाश करून प्रकरणातील मुख्य आरोपी तेलगी याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला जन्मठेप ची शिक्षा दिली. पण, गेल्या काही दिवसापासून त्याची तब्येत खालावली होती. बेंगलोर येथे त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

बेंगलोर व्हिक्टोरिया रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तेथे त्याचे निधन झाल्यानंतर मृतदेह बंगळूरहून आज खानापूराला आणले. घरी मृतदेह ठेवण्यात आला होता. अंत्य दश॔न झाल्यानंतर दुपारी रीतिरिवाजाप्रमाणे स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला आहे.