SHARE

बेळगाव: आयजीपी म्हणून अलोक कुमार यांनी आज पदभार स्वीकारला आहे. गुलबर्गा येथे आयजीपी म्हणून ते सेवा बजावत होते. येथून त्यांची बेळगावला बदली झाली होती. यानिमित्त पदभार स्वीकारला आहे. वरीष्ठ पोलिस अधिकारी, पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला आणि काम सुरू केले. जिल्हा पोलिस प्रमुख रविकांत गौडा, पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा आणि अधिकाऱ्यांनी अलोककुमार यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.