SHARE

बेळगाव: महाराष्ट्र कर्नाटक सीमप्रश्नाचे समन्वक आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ‘हुटीदरे कन्नड नाडू नल्ली हुट बेकू’ म्हणजे ‘जन्मलो तर कर्नाटकात जन्मावे’ असा भावार्थ असलेले गीत गोकाक येथील कार्यक्रमात म्हटले आहे. गोकाकच्या तवग येथील दुर्गादेवी मंदिर उदघाटन कार्यक्रमाला मंत्री पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे गीत म्हटले आहे. सीमाप्रश्नासाठी समिती नेत्यांची बैठक घेऊन दाव्याला भक्कम करावे, अशी मागणी करण्यात येत असताना त्यासाठी वेळ नाही. कार्यक्रमाला बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी देखील उपस्थित होते. त्याठिकाणी हे गीत म्हणून मराठी भाषिकांना डीवचण्याचा प्रयत्न केला आहे.

एकीकडे गेली 61 वर्षी बेळगावची जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. हा खटला सुरू असताना चांद्रकांतदादा पाटील यांनी कन्नड भाषा व त्यावर दाखविलेले प्रेम सिमवासियात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले आहे.