SHARE

बेळगाव: येथील राणी चनमा विद्यापीठतर्फे उद्या (ता.31) सहावा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आरसीयूचे कुलसचिव शिवानंद होसमनी यांनी आज (ता 30) पत्रकार परिषदेत दिली. यंदाचा सहावा पदवीदान समारंभ असून 18 जणांना पीएचडी प्रदान केली जाईल. 8 पदव्युत्तर विद्यार्थाना सुवर्णपदक दिले जाईल. तसेच बीए परीक्षेत अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थी वर्गाचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच बी कॉमच्या 12, 10 बी एस्सी विद्यार्थ्यांनी अधिक गुण मिळविले आहे, त्या साऱ्या विद्यार्थी वर्गाचा सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. ऐकून 176 विद्यार्थांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती होसमनी यांनी दिली.