SHARE

बेळगाव: महिला आघाडीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या समिती माझी मी समितीचा असा आशय असलेल्या स्टीकर मोहिमेत महापौर संज्योत बांदेकर यांनी देखील सहभाग दर्शवला होता. गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली भागात महापौर संज्योत बांदेकर यांनी घरोघरी जाऊन समिती माझी स्टीकर चिटकवले.

सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात साक्षी पुरावे नोंदवायच्या उंबरठ्यावर असल्याने लोकेच्छा दाखवण्यासाठी समितीच्या विधान सभेत आमदार निवडून येणे गरजेचे आहे या करिता आगामी विधान सभा निवडणुकीत मराठी भाषक जनतेने समितीलाच विजयी करा असे आवाहन महिलानी केले. महापौर संज्योत बांदेकर यांनी अनेक युवकांच्या दुचाकी वर देखील ‘समिती माझी..’स्टीकर चिटकवले. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, महिला आघाडी सरचिटणीस माजी महापौर सरिता पाटील यांच्या सह नगरसेवक मोहन बेळगुंदकर, मोतेश बारदेशकर, संजय पाटील सह महिलांनी देखील सहभाग नोंदवला होता.