SHARE

बेळगाव: बेळगाव-हैद्राबाद नवीन विमानसेवा स्पाईस जेट कंपनीच्या वतीने 25 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पाईस जेट विमानाने हैद्राबादला जाण्यासाठी ३ तास ४० मिनिटे वेळ लागायचा. बेळगाव येथून चेन्नई आणि तेथून हैद्राबादला जावे लागत. आता थेट बेळगाव ते हैद्राबाद विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ मार्च पासून नवीन विमानसेवा सुरु होणार असून एक तास दहा मिनिटात बेळगावहून हैद्राबादला पोहोचता येईल.

एस जी ३४६२ बेळगाव हैद्राबाद ही विमानसेवा दररोज रात्री ७:३० वाजता येऊन रात्री ११:१० हैद्राबाद अशी वेळ जुन्या विमानसेवेची होती. नवीन वेळेनुसार सकाळी एस जी ३५६३ ११:४५ वाजता बेळगावला येऊन दुपारी १२:५५ वाजता हैद्राबाद येथे जाईल.