SHARE

बेळगाव: चन्नम्मा चौक येथे कारने पेट घेतल्याची घटना आज घडली. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कार घेऊन एकजण जात असताना वाहनातून धूर आला. त्यामुळे वाहन चालक वाहनातून खाली उतरले आणि नेमके काय घडले, हे पाहत असताना वाहनाने पेट घेऊन आग लागली. या घटनेने वाहन जळून खाक झाले आहे. घटनेनंतर भागातील लोक जमले आणि पोलीस आले.