SHARE

बेळगाव: भाजप पक्षाला पहिल्यादा देशाची चिंता असते. पण, काँग्रेस पक्षाला आपल्या परिवाराची काळजी असते, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावात झालेल्या जाहीर सभेत केली आहे. 5 वर्षात काँग्रेस पक्षाने काय केले आणि कुठे केले, याची उत्तरे काँग्रस पक्षाला आता जनतेला द्यावी लागतील. मोदी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात स्थान मिळविले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मनही निंकले आहे. राज्यातील सर्व जनतेनी मतदान करून कमळाला मत द्यावे. काँग्रेसला पराभवाची भीती आहे. त्यासाठी सिद्धरामय्या बदामी इथून निवडणूक लढवीत आहेत, अशी टीका मोदी यांनी केली.

2022 पर्यंत सर्वाना घरे दिली जातील. तसेच पाणी, वीज, शुद्ध आहार दिले जाईल. सुविधा उपलब्ध करून देत असून बेळगावात नवीन तंत्रज्ञान आणले जाईल. कर्नाटक राज्यातील सचिवशी सतत चर्चा करून काम करून घेत आहे. तशी काळजी सिद्धरामय्या यांना नाही. निवडणूक हरल्यानंतर मतदान यंत्रणेत गडबड होती, अशी टीका काँग्रेस करेल, असा टोला मोदी यांनी लगवीला.