SHARE

बेळगाव: खानापूर विधानसभा मतदार संघात डॉ. अंजली निंबाळकर यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याच्या मार्गावर आहे. अपवाद एकदा वगळता खानपुरात बिगर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. पण, पहिल्यादा एक काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर खानापूर येथे इतिहास रचण्याच्या मार्गावर आहेत. विजयाच्या प्रमुख दावेदार त्यांना मानले जात आहे.विधानसभा निवडणूक जेमतेम दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. या कालावधीत निंबाळकर यांनी जाहीर प्रचार येथे करून काँग्रेसमय वातावरण निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. काही काँग्रेस कार्यकर्ते पक्षापासून दूर गेली होती. त्यांना त्यांनी पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी झाले आहे. तितकेच नाही तर त्या अन्य पक्षातील उमेदवारांची मने जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यामूळे भाजप, जेडीएस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीमधून अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. निंबाळकर याच्या झंझावाती प्रचार केला आहे.खानापूर येथे अंजली यांनी क्रिकेट आणि विविध क्रीडा स्पर्धा घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केला आहे. अनेक संस्कृती कार्यक्रम घेतले. येथे अनेक वर्षे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षाने अंजली निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस समर्थक आणि कार्यकर्ते यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे अंजली यांना पाठिंबा वाढतो आहे. काँग्रेस उमेदवार अंजली यांच्या गळ्यात येथील मतदार यावेळी नक्की विजयाची माळ घालून पहिल्यांदा एक महिला उमेदवार यांना प्रतिनिधींत्व करण्याची संधी मिळेल, असा विश्वास आहे.