SHARE

बेळगाव: थकीत ऊस बिल 1400 कोटी पैकी 800 कोटी रुपये वसूल केले आहे. 600 कोटी रुपये बाकी असून 15 दिवसात देण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती शूगर मंत्री के. जे. जॉर्ज यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री जॉर्ज यांनी साखर उद्योग क्षेत्रात अडचणी आल्या आहेत. यासाठी बिल थकीत असून पण शेतकऱ्यांची बिले अदा करणे आवश्यक आहे. यांबाबत सूचना दिल्या आहेत. 15 दिवसांची मुदत दिली आहे, अशी माहिती जॉर्ज यांनी दिली आहे.

ऊस बिल देण्यास विलंब केलेल्या कारखान्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. मुदतीत बिले न दिल्यास कारवाई केली जाईल, असे जॉर्ज यांनी सांगितले.