SHARE

बेळगाव: कर्नाटकात कोट्यावधी मराठा समाज आहे. पण राज्यकर्त्यांनी त्यांचा मतासाठी उपयोग करुन घेतला पण त्यांना विकासभिमूख योजनां न राबवता वंचीतच ठेवले.त्यासाठी महाराष्ट्रात जसे आरक्षण मीळावे तसे कर्नाटकातही मराठा समाजाला आरक्षण मीळावे म्हणून याआधी लाखोंच्या संखेने मराठा क्रांती मुक मोर्चे काढत आपल्या मागण्यांचे निवेदन त्या त्या ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांना देन्यात आले.पण अजूनही त्या मागण्या मान्य करण्याच्या हालचाली न झाल्याने पुन्हा शनिवार दिं ४/८/२०१८ रोजी धारवाड तसेच परिसरातील मराठा समाजाने हजारोंच्या संख्येने जनतेने जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन,तीन कि मी पायी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.प्रमूख मागण्या: १)कर्नाटकातील मराठा समाजाला आरक्षण ३ब तून २अ मधे समाविष्ट कराव.
२)धारवाड युनिव्हर्सिटी मधे स्वतंत्र छत्रपती शिवाजी महाराज आध्ययन विद्यापीठ स्थापन कराव.
३)मराठा समाजाला प्राथमीक ते पदवीपूर्ण शिक्षणात आरक्षण ठेवाव.
४)छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाचा विकास करुन राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित कराव.
५)कर्नाटकात आरक्षण नुसार मराठा समाजातील मंत्री नियूक्त करावा.या प्रमुख मागण्यासह इतर मागण्या निवेदनात होत्या. कर्नाटक शासनाने मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मान्य करुन लौकरातलौकर अध्यादेश जारी करावा अन्यथा महाराष्ट्रात जसे आता ठोक मोर्चे होताहेत तसे कर्नाटकातही मराठा समाज ठोक मोर्चे काढल्याशिवाय रहाणार नाही असा संयोजकातर्फे इशारा देण्यात आला.मोर्चा यशस्वी करण्यासाठी बसवराज जाधव,भिमाप्पा कसाई,नारायण हुबळी,विजय भोसले,मंजूनाथ कदम,पि के निर्लकट्टी यासह अनेक संयोजक उपस्थित होते.