SHARE

बेळगाव: कळसा भांडूरा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी माहिती पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. खानापूर दौरा मंत्री शिवकुमार यांनी केली असून या दौऱ्यात पाणी पुरवठा आणि योजना पूर्ण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केली आहेत. यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. राज्य सरकारपुढे विषय मांडला जाईल, अशी माहिती दिली आहे.