SHARE

बेळगाव: अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी आता कायदा आणला जावा, देशातील जनतेची तशी मागणी असल्याचे संभाजी मैदान येथील बैठकीत सांगीतले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र मनोहरनाथ होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज सभा घेण्यात आली. या सभेत अयोध्येत राम मंदिर निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. तसेच निर्णयाचे निवेदन खासदार सुरेश अंगडी यांना दिले. केंद्राकडे या विषयाचा पाठपुरावा करून मंदिर निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दला आणि विविध हिंदू संघटनाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.