SHARE

बेळगाव: शेतकरी विरोधी धोरण विरोधात अधिवेशन पहिल्या दिवशी उद्या (ता.10) शेतकऱ्याचा निषेध मोर्चा आहे, असे भाजपचे माजी सहकार मंत्री लक्ष्मण सवदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऊस उत्पादकांची थकबाकी, पीक विमा योजनेची राज्यात अमलबजावणी करण्यात सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ आणि कृषी मालाला योग्य दर देण्यात सरकारला अपयश आले आहे. आश्वासने पूर्ण करण्यास सरकार फोल ठरले आहे. दुष्काळाचा फटका बसला असताना त्याचे नियोजन आणि निवारण करणे युती सरकारला अपयश, थ्री फेज वीज करीता 8 तास वीजपुरवठा मागणीसाठी आंदोलन केले जाते, अशी माहिती सवदी यांनी दिली. खासदार सुरेश अंगडी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके उपस्थित होते.