SHARE

बेळगाव: बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघा संशयित आरोपीना अटक करून ₹1 कोटी 81 हजार रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. प्रकरण गंभीर असल्यामुळे पुढील तपास सीबीआयकडे दिले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.वडगाव येथील असिफ शेख आणि श्रीनगर येथील रफिक देसाई अशी संशयित आरोपीची नावे असून त्यांच्याकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. शेख हा देसाईंला बनावट नोटा आणून देत असताना पोलिसांनी छापा घालून कारवाई केली आहे. 2000 रुपयांचे 50 बंडल जप्त करण्यात आली आहे. नोटा पहिल्यांदा पाहिल्यानंतर हुबेहूब असली वाटतात. पण, निरीक्षण केल्यानंतर नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस तपासात शेख बनावट नोटाची घरी करायचा. घरी लपटॉप आणि कलर प्रिंटरची मदत घेऊन बनावट नोटा चलनात आणले जायचे, अशी माहिती राजप्पा यांनी दिली आहे.