SHARE

बेळगाव: राज्यात पक्षीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत असून येत्या आठवड्यात काँग्रेस-जेडीएस सरकार पायउतार होईल. बी. एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य माजी मंत्री आमदार उमेश कत्ती यांनी बुधवारी केले आहे. ऑपरेशन लोटस सुरू नाही. 15 आमदार भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे अस्थिर सरकार कोसळेल. नवीन सरकार भाजप घेऊन येईल, असे उमेश यांनी सांगून खळबळ उडवून दिली आहे.

माजी मंत्री रमेश जारकीहीळी माझे चांगले मित्र असून नजीकच्या कालावधीमध्ये त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यास आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नसल्याचे उमेश यांनी सांगितले आहे.