SHARE

बेळगाव: मंत्रीपदावरून हकालपट्टी झालेल्या माजी मंत्री रमेश जारकीहोळी महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुबईला गेल्याची माहिती पुढे आली आहे. मंत्रिपदावरून पायउतार झाल्याने रमेश यांनी काँग्रेस पक्ष नेत्यांशी संपर्क तोडला असून संपर्क होण्यास तयार नसल्याची माहिती आहे. भाजप नेते आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश मुबईला गेले असून त्याठिकाणी महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील, असे मानले जात आहे. 10 ते 12 आमदार पाठीशी असल्याचा दावा करून भाजपला पाठिंबा देण्याची तयारी आहे. त्यामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.