SHARE

बेळगाव: माजी आमदार दत्तू हक्क्यागोळ चिकोडीजवळ कनगला रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ते 79 वर्षाचे होते. पत्नी व तीन मुले असा परिवार त्यांच्या मागे आहे. 2004 मध्ये दत्तू आमदार होते. यापूर्वी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून ते निवडून गेले होते. अत्यंत प्रामाणिक अशी त्यांची प्रतिमा होती.