SHARE

बेळगाव: मण्णूरात महाराष्ट्र राज्य मण्णूर फलक लावल्याच्या प्रकरणात 10 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. २८/७/२०१४ रोजी सुधीर मारुती काकतकर, राजू म्हात्रू चौगुले, राजू बाळू होनगेकर, मारुती बाळू होनगेकर, मधू भैरु चौगुले, सुनील कल्लाप्पा सांबरेकर, शिवाजी बाळाप्पा कदम, संजू महादेव मंडोळकर, मारुती गूंडू होनगेकर,अरुण सोमान्ना कदम या मण्णूर येथील समिती कार्यकर्त्यांवर सरकारी फलकावर महाराष्ट्र राज्य मण्णूर लावल्याचा आरोप होता. चौथ्या जेएमएफसी न्यायालयात शनिवारी सुनावणी झाली. या खटल्यात सरकारतर्फे १५ जनांची साक्ष नोंदवण्यात आली होती. गुन्हा शाबित न झाल्याने न्यायालयाने समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. ऍड. महेश बिर्जे यांनी काम पाहिले.