SHARE

बेळगाव: अलारवाड ब्रिजनजीक एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केले करून खून करण्यात आले आहे.

घटना नेमकी कधी घडली आहे त्याची माहिती नाही. पण, रविवारी रात्री खून झाल्याचा संशय आहे. खून झालेल्‍या व्यक्तीची ओळख पटली नाही. अलारवाड पुलाजवळ मृतदेह पडल्याचे आज सकाळी आढळून आले. माळमारुती पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला असून माहिती संग्रहित केली जाते आहे.